School Holidays : मोठी बातमी! शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर; पाहा महत्वाच्या तारखा
School Holidays : नाशिक शहरातील राज्य मंडळाशी संलग्न शाळांना २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी. प्राथमिक शाळा १७ तर माध्यमिक शाळा १८ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार.

School Holidays : नाशिक – शहरातील राज्य मंडळाशी संलग्न शाळांना यंदा २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी सुरू होणार आहे. प्राथमिक शाळांना २ ते १७ नोव्हेंबरपर्यंत, तर माध्यमिक शाळांना २ ते १८ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी असेल. त्यामुळे प्राथमिक शाळा १८ नोव्हेंबरला, तर माध्यमिक शाळा १९ नोव्हेंबरला सुरू होतील.
दिवाळीची सुट्टी प्राथमिक शाळांसाठी १५ दिवसांची, तर माध्यमिक शाळांसाठी १६ दिवसांची आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना समान कालावधीची सुट्टी मिळावी, अशी शिक्षक संघटनांची मागणी होती. मात्र, यंदाही सुट्टीच्या कालावधीत एक दिवसाचा फरक कायम राहिला आहे.
सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सूचनेनुसार नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ‘संकलित चाचणी-१’ घेण्यात येणार आहे. गणित, इंग्रजी आणि मराठी विषयांची चाचणी घेतली जाणार असून, इतर विषयांच्या परीक्षा शाळास्तरावर होणार आहेत. त्यामुळे सुट्टी संपल्यानंतर अवघ्या आठवडाभरात शाळांना परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
सुट्टीच्या तारखा :
– प्राथमिक शाळा : २ ते १७ नोव्हेंबर
– माध्यमिक शाळा : २ ते १८ नोव्हेंबर





