नवीन संक्रमितांमध्ये सर्वात जास्त 18 हजार महाराष्ट्रात

नवी दिल्ली – देशात आतापर्यंत एकूण 1 कोटी 14 लाख 38 हजार 464 लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. नवीन संक्रमितांचा आकडा जवळपास तीन महिने मागे गेला आहे. यापेक्षा जास्त 30,354 केस 12 डिसेंबरला आल्या होत्या. मंगळवारी नवीन संक्रमितांमध्ये सर्वात जास्त 17,864 रुग्ण केवळ महाराष्ट्रातच आढळले होते.
देशात मंगळवारी 28,869 कोरोना पॉझिटिव्ह आढळले.17,746 बरे झाले आणि 187 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 10,935 ची वाढ झाली.
देशात आतापर्यंत एकूण 1 कोटी 14 लाख 38 हजार 464 लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 1 कोटी 10 लाख 43 हजार 337 बरे झाले आहेत. 1 लाख 59 हजार 79 ने जीव गमावला आहे. तर 2 लाख 31 हजार 335 जणांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात मंगळवारी 17,864 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आणि 9,510 रुग्ण बरे झाले आणि 87 जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 23.47 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 21.54 लाख रुग्ण असे आहेत जे बरे झाले आहेत. तर 52,996 संक्रमितांनी जीव गमावला आहे. सध्या 1.38 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.





