IMD Rain Update : राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांना खुशखबर; पाऊस जोरदार कोसळणार
IMD Rain Update : ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने विदर्भातील शेतकरी चिंतेत असतानाच नागपूर हवामान विभागाने (IMD) मोठी आणि दिलासादायक बातमी दिली आहे.

IMD Rain Update : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने विदर्भातील शेतकरी चिंतेत आहेत. ऑगस्ट महिन्यात विभागात पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून, त्यामुळे खरीप पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, आता विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून दिलासादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. (IMD Rain Update)
येत्या 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. नागपूर हवामान विभागाने याबाबत काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (IMD Rain Update)
विदर्भातील 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट
नागपूर हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागांत जोरदार सरीही कोसळू शकतात. (IMD Rain Update)
विशेष म्हणजे 4 सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दिवशी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (IMD Rain Update)
ऑगस्टमध्ये पावसाची मोठी तूट
नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, यंदा ऑगस्ट महिन्यात विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. अनेक भागांत पावसाअभावी शेतीची परिस्थिती चिंताजनक बनली असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. आता सप्टेंबरच्या सुरुवातीला होणारा पाऊस ही तूट कितपत भरून काढतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (IMD Rain Update)
एल निनोचा परिणाम?
हवामानातील बदलत्या परिस्थितीचा पावसावर परिणाम होत असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. एल निनोचा प्रभाव वाढल्यास आगामी काळात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विदर्भात सर्वदूर आणि सातत्यपूर्ण पाऊस पडेलच, असे सध्या निश्चितपणे सांगता येत नाही. (IMD Rain Update)
राज्यातही पावसाची मोठी तूट
ऑगस्ट महिन्यात राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, मराठवाड्यात सुमारे 69 टक्के, विदर्भात 58 टक्के, तर राज्याच्या सरासरी पावसात 46 टक्क्यांची तूट असल्याचे सांगण्यात आले आहे. (IMD Rain Update)
त्यामुळे आगामी काही दिवसांत पडणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः यलो आणि ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कितपत बरसतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (IMD Rain Update)
Maharashtra Rain Update : राज्यात पावसाने दिली ओढ; कोरडे आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता






