Maharashtra Rain Update : आजही पावसाचा जोर कायम! नद्यांना पूर, अलर्ट जारी
Maharashtra Rain Update : नाशिकच्या घाटमाथा परिसरातही यलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Update : राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि नाले ओसंडून वाहत असून नद्यांना पूर आल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना आज देखील अलर्ट जारी केला आहे.
कोकण विभागातील पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. तर आज देखील ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. Maharashtra Rain Update
कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता आहे. भंडारा शहरासह जिल्ह्यातील तुमसर तालुका आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसानं जोरदार हजेरी लावली.
दरम्यान, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्या घाटमाथा परिसरातही यलो अलर्ट जारी केला आहे.
पुण्यात महापौरांची पहाटेपासून पाहणी
पुण्यातही गेल्या पाच ते सहा दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे खडकवासला धरणातील पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ झाली. खडकवासला धरणातून 27000 क्युसेसने मुठा नदी पात्रात विसर्ग सुरू झाला. एकता नगर सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासनाकडून उपायोजना केल्या जात आहेत. Maharashtra Rain Update
दरम्यान, पुणे शहरातील नदी पात्रात पाणी पातळी वाढते आहे, त्यामुळे सखल भागातील नागरिकांना सावध करण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांनी राजपूत नगर, पुलाचीवाडी, एकता नगरी, निंबजनगर या भागात पहाटेपासून पाहणी केली आहे.
हेही वाचा:






