Maharashtra Rain Alert : राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Heavy Rain Alert : राज्यातील अनेक भागात कालपासून पाऊस हजेरी लावत आहे. सध्या सर्वत्र धो-धो पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागात पावसाने पिकांचे नुकसानही केले आहे. हवामान विभागाने पुढील 4 दिवस म्हणजेच 28 सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून मंगळवारी (24 सप्टें.) गुजरा, राजस्थानच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून बाहेर पडला आहे. परतीच्या मान्सूनची सीमा फिरोजपूर, सिरसा, चुरू, अजमेर, माउंट अबु, दिसा, सुरेंद्रनगर, जुनागढ येथून जात आहे. मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मीती झाली आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळ राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे.
विभागानुसार अलर्ट –
रेड अलर्ट – कोकण (24,26 सप्टेंबर), मध्य महाराष्ट्र (25 सप्टें.)
ऑरेंज अलर्ट – मध्य महाराष्ट्र (24, 26 सप्टें.), मराठवाडा (24 सप्टें.), विदर्भ (25 सप्टें.)
येलो अलर्ट – कोकण (27 सप्टें.), मध्य महाराष्ट्र (27 सप्टें.), मराठवाडा (25 सप्टें.), विदर्भ (24,26,27,28 सप्टें.)






