Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात आजही पाऊस राहणार कायम; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
Maharashtra Rain Alert : अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावली आहे. काल बुधवारी पुण्यासह काही ठिकाणी गारांसह पाऊस पडला. आज गुरूवारी, 2 एप्रिल रोजी पुन्हा महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिट होण्याची शक्यता असून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात 31 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
तर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील इतर भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने, हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. Maharashtra Rain Alert
गहू आणि ज्वारी पिकांसह आंबा बागांनाही फटका
धाराशिव, कळंब, तुळजापूर या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला असून या पावसानं द्राक्ष आंबा, केळी या फळ पिकासह ज्वारी व काढणीला आलेला गहू देखील मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे.
तर वाशिम तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतातील बिजवाई कांदा, गहू आणि ज्वारी पिकांसह आंबा बागांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबईसह पुण्यात दाटलेल्या ढगांमुळे राज्यातील शहरी आणि डोंगराळ भागात पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यासह कल्याण-बदलापूर भागांत पावसाची शक्यता कमी असून, पुणे लोणावळामध्ये सर्वाधिक शक्यता आहे. लोणावळा आणि पुण्यातील पश्चिम घाट प्रदेशात येत्या काही दिवसांत पाऊस वाढणार आहे.
पुण्यात ‘यलो ॲलर्ट’ जाहीर
पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात थोडी वाढ होणार आहे. आकाश दुपारनंतर ढगाळ राहून संध्याकाळी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याला भारतीय हवामानशास्त्र विभागाने ‘यलो ॲलर्ट’ जाहीर केला आहे. Maharashtra Rain Alert
दरम्यान, या सतत होणाऱ्या पावसामुळे राज्यातील पारा खाली उतरला आहे. मार्च महिन्यात चाळीशी गाठलेले तापमान आता 32 ते 33 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे काहीसा नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. Maharashtra Rain Alert
हेही वाचा:






