Maharashtra Politics : भाजपच्या ‘या’ 2 आमदारांच्या अडचणीत वाढ ! आमदारकी जाणार की राहणार?

मुंबई : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील भाजपचे दोन आमदार सध्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीत नियमांचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे त्यांची आमदारकीदेखील जाण्याची शक्यता आहे.
भाजपच्या ‘या’ 2 आमदारांच्या अडचणीत वाढ !
हिंगणा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे आणि काटोल मतदारसंघाचे आमदार चरणसिंह ठाकूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही आमदारांना तीन आठवड्यांच्या आत आपला जबाब सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हे पण वाचा : अखेर ! छत्रपतींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर
काय आहे नेमके प्रकरण?
हिंगणा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार रमेशचंद्र बंग यांनी आमदार समीर मेघे यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत निवडणुकीत आचारसंहिता व निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर काटोल मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सलील देशमुख यांनी भाजपचे आमदार चरणसिंह ठाकूर यांच्या विरोधात अशाच प्रकारची याचिका दाखल केली होती. या दोन्ही याचिकांमध्ये संबंधित आमदारांच्या निवडीला अवैध ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे.
आमदारकी जाणार कि राहणार?
या घडामोडीमुळे दोन्ही आमदारांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पुढील काही आठवड्यांत या प्रकरणातील दिशा स्पष्ट करेल. त्यामुळे या आमदारांची आमदारकी राहणार कि जाणार? (Maharashtra Politics) हे येत्या काही दिवसांत आपल्याला समजेल.





