Maharashtra Politics : शपथविधीच्या कार्यक्रमांनंतर मनसे नेत्याची प्रतिक्रिया ; म्हणाले, “विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी…”

मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये परत एकदा परत एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिदें-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला आहे.
अजित पवार यांच्यासोबत 30 ते 40 आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शिवसेनेनंतर सेनेनंतर राष्ट्रवादीही फुटली असल्याचं निश्चित झालं आहे.
राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते गजानन काळे यांनी थेट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनसे नेते यांनी ट्विट करत म्हटले आहे की,” विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी करून दाखवले. नुसती सेना नाही तर राष्ट्रवादी पण फोडून दाखवली. तसेच त्यांनी #पायगुण असं देखील म्हटलं आहे.
तसेच त्यांनी अजित पवारांवर देखील मिश्किल टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की,” मी मरे पर्यंत राष्ट्रवादीत … अजित दादा उवाच …फक्त पवार साहेब सोडून हे म्हणायला विसरले असावेत …”
तसेच महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “विचार,तत्व, पक्षनिष्ठा ,मूल्य यांना श्रद्धांजली .महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला…” असं म्हटलं आहे.






