Maharashtra Politics : महायुतीमध्ये मोठी खळबळ ! शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने केलं बंड
राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी (Maharashtra Politics) सुरू असून सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांना 'एबी फॉर्म' देऊन प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे.

Maharashtra Politics : राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी (Maharashtra Politics) सुरू असून सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ देऊन प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे. दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीमधील जागावाटपाचे चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही संपलेले नाही.
जागावाटपाचा हा तिढा सुटण्याआधीच महायुतीला मोठा आणि जबर धक्का बसला आहे. सांगली-सातारा विधानपरिषद मतदारसंघातून महायुतीमध्ये (Maharashtra Politics) उघड बंडखोरी पाहायला मिळत असून, शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याने थेट उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जागावाटपाचा तिढा कायम, ‘या’ जागांवरून वाद
महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप अंतिम झालेला नाही. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जागांवरून (Maharashtra Politics) जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किमान तीन जागांवर आपला दावा ठोकला आहे. हा वाद सुरू असतानाच आता सांगली-साताऱ्यात नवीन डोकेदुखी वाढली आहे.
तानाजी पाटलांचे थेट शक्तीप्रदर्शन
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते तानाजी पाटील यांनी सांगली-सातारा विधानपरिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, हा अर्ज भरताना त्यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या ताफ्यासह जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी आटपाडी तालुक्यातील शिवसेना पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागा भाजपची, उमेदवारी शिंदे गटाची!
सांगली-सातारा विधानपरिषदेची ही जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपचाच अधिकृत उमेदवार असणे अपेक्षित मानले जात होते. मात्र, जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच आणि भाजपचा उमेदवार ठरण्याआधीच शिंदे गटाच्या नेत्याने उमेदवारी अर्ज भरल्यामुळे महायुतीतील अंतर्गत बिघाड चव्हाट्यावर आला आहे.
‘पक्षाच्या आदेशानंतरच पुढची भूमिका’
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तानाजी पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. “मी सध्या माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून काय आदेश येतो, त्यानुसार आम्ही आमची पुढची राजकीय भूमिका ठरवू,” असे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे लक्ष
दरम्यान, महायुतीच्या उमेदवारांची अधिकृत यादी आजच जाहीर केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भाजप आपल्या वाट्याची ही जागा स्वतःकडेच ठेवून उमेदवार जाहीर करणार की तानाजी पाटलांच्या बंडखोरीनंतर या जागेबाबत महायुतीत काही नवीन तडजोड होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






