Police Recruitment : मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
Police Recruitment : महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या तरुणींसाठी राज्य सरकारने एक अत्यंत संवेदनशील आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.

Police Recruitment : पोलीस भरतीसाठी मेहनत करणा-या तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आली, तर तरुणींना पुढील तारीख किंवा काही दिवसांची मुदतवाढ दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी केली आहे. (Police Recruitment)
मासिक पाळीमुळे शारिरीक चाचणीदरम्यान अडथळा निर्माण होऊन तरुणींची वर्षभराची मेहनत वाया जाऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. यासाठी राज्य सरकारने ५ ते ६ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Police Recruitment)
पोलिस भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेइतकीच, किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाची शारीरिक चाचणी असते. यामध्ये धावणे, गोळाफेक आणि लांब उडी यांसारख्या कसदार चाचण्यांचा समावेश होतो. (Police Recruitment)
अनेकदा असे घडते की, प्रचंड मेहनत करूनही केवळ शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यामुळे तरुणींना पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, अशक्तपणा किंवा चक्कर येणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. (Police Recruitment)
त्यामुळे अनेक तरुणींना आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करता येत नाही आणि त्यांची संधी हुकते. तरुणींची ही अडचण लक्षात घेऊन, आता जर एखाद्या उमेदवाराला शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळीचा त्रास होत असेल, तर तिला तत्काळ बाद न करता पुढील संधी दिली जाणार आहे. (Police Recruitment)
आरोग्य तपासणी अनिवार्य
भरती प्रक्रियेदरम्यान एखाद्या तरुणीला मासिक पाळी आल्यास तिथे उपस्थित असलेल्या आरोग्य पथकाकडून तिची तपासणी करण्यात येईल. आरोग्य तपासणीनंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, तिला ५ ते ६ दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल. (Police Recruitment)
त्यानंतर तिची शारीरिक चाचणी घेतली जाईल. काही गंभीर प्रकरणांमध्ये जर उमेदवाराला अधिक मुदतीची गरज भासल्यास, त्याचाही विचार केला जाणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Police Recruitment)
Police Recruitment : राज्यात ८ हजारांहून अधिक जागांसाठी पोलीस भरती होणार; कधीपासून होणार सुरुवात?





