Hindustani Bhau : ‘तुम्ही जेवता ना @# तर नाही खात ना?’; माधुरी हत्तीण वादात हिंदुस्थानी भाऊची उडी, Video व्हायरल
Hindustani Bhau | madhuri elephant | kolhapur | कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा पशु कल्याण केंद्रात हस्तांतरित करण्यात आल्यानंतर नांदणी गावात आणि परिसरात तीव्र नाराजी पसरली आहे. ३० जुलै २०२५ रोजी मध्यरात्री पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आणि प्राणी रुग्णवाहिकेतून महादेवीला वनताराला पाठवण्यात आले आहे.
मात्र महादेवीला पुन्हा नांदणीला आणण्यासाठी ग्रामस्थ, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. सोशल मीडियावर देखील या संदर्भातील अनेक पोस्ट व्हायरल होत असून, माधुरी हत्तीचे विविध व्हिडीओ आणि फोटो शेअर केले जात आहेत.
अशातच आता हिंदुस्थानी भाऊ याने माधुरी हत्तीणीवर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, “मी हिंदुत्ववादी विषयावर कायमच वक्तव्य करत असतो. यामुळे माझे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले होते. बंद होते. जे आता नीट सुरू आहे. त्याने सांगितलं की खूप दिवसांनातर सोशल मिडिया हाताळल्यानंतर मला सर्वत्र चर्चा दिसते ती म्हणजे कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीची.
View this post on Instagram
कोल्हापूरची माधुरी हत्तीण हिच्यावरून देखील आता राजकारण सुरू झाले आहे. गेली इतके वर्ष ही हत्तीण कुठे होती? काय खात- पित होती? या विषयी कोणी राजकारण्यांनी विचारपूस केली नाही मात्र आता निवडणूका आल्यामुळे या हत्तीची काळजी करताना दिसत असल्याचं म्हटलं आहे.
पुढे त्याने, माधुरी हत्तीणीच्या पायांना जखमा झालं असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय माधुरी हत्तीणीला कार्यक्रमात भाड्याने दिले जायचे मुक्या जनावरांना हे लोक भाड्याने देऊन त्यावर पैसे कमवायचे. असा हा एकप्रकारचा व्यवसाय सुरू होता असं त्याने सांगितलं आहे. तसेच त्याने या व्हिडिओत “तुम्ही जेवता ना @# तर नाही खात ना?” असं देखील म्हंटलं असून, त्याचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. हिंदुस्थानी भाऊच्या विधानामुळे नेटकरी चांगलेच भडकले असून यावर संताप व्यक्त करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले…
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरकरांच्या भावनांचा आदर करत महादेवीला परत आणण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. 5 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की, “महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण परत यावी, ही आमची भूमिका आहे. तिची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे पथक तयार केले जाईल, आणि राज्य सरकार नांदणी मठासोबत पूर्ण ताकदीने उभे राहील.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्रालयात आयोजित बैठकीत महादेवी हत्तीणीच्या परतीसाठी कायदेशीर आणि प्रशासकीय पावले उचलण्याचे निर्देश दिले. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, गणेश नाईक, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते.





