Maharashtra NCP Crisis : 2024 साली पंतप्रधान नरेंद्र मोदीचंंच सरकार येणार – अजित पवार

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केलं. ते राष्ट्रवादीच्या आठ बड्या नेत्यांसह शिवसेना, भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी 8 नेत्यांसोबत शपथ घेतल्यानंतर शरद पवार हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. आम्ही महाविकास आघाडीसोबतच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या सर्व घडामोडींनंतर आणि राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज अजित पवार आणि शरद पवार गटाकडून मुंबईमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
या मेळाव्यात बोलताना यावेळी बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच 2024 साली पंतप्रधान कोण होणार याबाबतही अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.
अजित पवारांनी सांगितलं की, “आमच्या अनेक बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये पहिल्या रांगेतील अनेक आमदार नेते उपस्थित असायचे.तेव्हा आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की, 2024 सालातही नरेंद्र मोदी यांचंच सरकार येणार. मी खोटं नाही बोलणार. मला खोटं बोलून काहीही मिळवायचं नाही.” असं अजित पवार यांनी सभेत सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, 2024 साली पंतप्रधान नरेंद्र मोदीच सरकार येणार आहे. आपल्याला ताकदीने विधानसभा लढवायची आहे. आपले 54 आमदार आहेत, तेवढ्या जागा तर आपल्याला मिळणारच आहे. त्यापेक्षा काँग्रेसच्या जागा आपल्याला मिळतील. जवळपास 90 जागा आपल्याला लढवायच्या असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले.





