Vidhan Parishad Election 2026 : मोठी राजकीय घडामोड..! ‘या’ बड्या नेत्याचा अर्ज बाद; विधानपरिषद निवडणुकीची समीकरणे बदलणार?
Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज छाननीच्या दिवशी (२ जून २०२६) राज्याच्या राजकारणात दोन मोठे उलटफेर झाले आहेत.

Vidhan Parishad Election 2026 : राज्यातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. अमरावती मतदारसंघातील महायुतीचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान बाद करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीची गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Vidhan Parishad Election 2026)
हर्षजीत देशमुखांच्या आक्षेपानंतर कारवाई
महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी विप्लव बाजोरिया यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्जाची छाननी करत उमेदवारी अर्ज बाद करण्याचा निर्णय घेतला. (Vidhan Parishad Election 2026)
या निर्णयानंतर बाजोरिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “आमचा अर्ज बाद व्हावा यासाठी चार उमेदवारांनी एकत्र येऊन कटकारस्थान रचले,” असा आरोप केला आहे. तसेच या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Vidhan Parishad Election 2026)
अमरावतीत आता चौरंगी लढत
विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद झाल्यानंतर अमरावती विधानपरिषद निवडणुकीत आता चार उमेदवार रिंगणात उरले आहेत.
- हर्षजीत देशमुख – महाविकास आघाडी
- प्रवीण पोटे – महायुती
- निलेश विश्वकर्मा – वंचित बहुजन आघाडी
- प्रशांत महल्ले
सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का
दरम्यान, सोलापूर विधानपरिषद निवडणुकीतही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्जही बाद करण्यात आला आहे. अर्ज पडताळणीदरम्यान सूचक नागेश भोसले यांच्या स्वाक्षरीबाबत आक्षेप नोंदविण्यात आला. तपासात स्वाक्षरी बोगस असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अर्ज फेटाळण्यात आला. या निर्णयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. (Vidhan Parishad Election 2026)
कुणाला होणार फायदा?
अमरावतीत विप्लव बाजोरिया यांच्या अर्ज बाद झाल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रवीण पोटे यांना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. बंडखोर उमेदवार मैदानाबाहेर गेल्याने मतविभाजन टळण्याची शक्यता असून महायुतीची ताकद वाढू शकते. दुसरीकडे, सोलापुरात काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने विरोधकांनाही फायदा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. (Vidhan Parishad Election 2026)





