‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 6 वर्ष पूर्ण; नम्रता संभेरावने शेअर केली भावनिक पोस्ट

Maharashtrachi Hasyajatra Show | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. यातील कलाकार मंडळी 6 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाने अनेक नवोदित कलाकारांनाही संधी दिली. यातील कलाकरांना देखील महाराष्ट्राचे भरभरून प्रेम मिळाले. नुकतेच या कार्यक्रमाचे 850 भाग पूर्ण झाले आहेत. यानिमित्त अभिनेत्री नम्रता संभेरावने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
नम्रताने हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “महाराष्ट्राची हास्यजत्रा मोठा प्रवास साडे 850 भागांचा 6 वर्षे अभिमानाची सुखाची भरभराटीची सोनी मराठी सोबतच्या नात्याची आणि हा प्रवास प्रेक्षकांशिवाय शक्य नव्हता, तुमचं अतोनात प्रेम जिव्हाळा आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हीच आमच्या कामाची पावती…हास्यजत्रेमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलोय खूप भारी वाटतंय तुमचं आमच्यावरच प्रेम असंच राहू द्या कायम”, असं कॅप्शन नम्रताने या पोस्टला दिलं आहे. Maharashtrachi Hasyajatra Show |
View this post on Instagram
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे. या मालिकेचे शो परदेशातही होत आहेत. येथेही प्रेक्षक मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले आहे. याचे अनेक व्हिडिओ यातील कलाकरांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. Maharashtrachi Hasyajatra Show |
दरम्यान, नम्रताने मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केले आहे. मात्र ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली. नुकत्याच आलेल्या ‘नाच गं घुमा’ या सिनेमात नम्रता मुख्य भूमिकेत होती. या सिनेमात तिच्यासोबत मुक्ता बर्वे देखील महत्त्वाच्या भूमिकेत होती. यातील तिच्या भूमिकेचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले होते.
हेही वाचा:
‘हर घर तिरंगा’ अभियानाचे चीनशी कनेक्शन तर खादी उद्योगावर होतोय थेट परिणाम’ काँग्रेसचा आरोप





