पुणे – पैशांचे वादाचे कारणावरुन चाकुने सपासप वार करुन खुनाचा प्रयत्न करुन पळुन गेलेल्या आरोपींना आठ तासाचे आत सातारा येथुन शिताफिने अटक. भारती विदयापीठ पोलीसांची ही कामगिरी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, योगेश माधवराव नगरकर ( रा. जांभुळवाडी, पुणे याने इसम नामे वैभव वाल्हेकर रा.आंबेगाव पठार पुणे याचेकडुन दोन लाख इतकी रक्कम हातऊसनी घेतली होती. सदरची रक्कम परत देत नाही या कारणावरुन दिनांक 29 मे रोजी दुपारी साडेचार वाजताचे सुमारास वैभव वाल्हेकर याने योगेश नगरकर यांना फालेनगर कमानी जवळ चर्चेसाठी बोलावुन घेतले.
तेथे वैभव वाल्हेकर व त्याचे इतर तिन साथीदार यांनी योगेश नगरकर याचेशी पैशाचे कारणावरुन वाद घातला. त्याला शिवीगाळ, दमदाटी करुन चाकु व चॉपर सारख्या धारदार व टोकदार हत्यारांनी योगेश नगरकर याचे पोटात सपासप चाकु खुपसुन तसेच त्याचे तोंडावर व इतरत्र हत्यारांनी वार केले. त्याला गंभिर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन पळुन गेले होते. यातील जबर जखमी झालेले योगेश नगरकर यांना रुग्णालयात ऍडमीट केले. त्यांचा भाऊ रविन्द्र नगरकर याने त्याबाबत आरोपी वैभव वाल्हेकर व त्याचे इतर तिन साथीदार यांचे विरुध्द भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली .
भारती विदयापीठ पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार राहुल तांबे व हर्षल शिंदे यांना आरोपी वैभव वाल्हेकर व त्याचे इतर साथीदार हे सातारा भागात असल्याची माहीती मिळाली. त्यानूसार यातील आरोपी वैभव वाल्हेकर, भुषण वाल्हेकर, तेजस चाळेकर, रोहीत कांबळे यांना सातारा येथुन तात्काळ ताब्यात घेवुन गुन्हा करताना त्यांनी वापरलेल्या गाडया त्यांचेकडुन जप्त केल्या. गुन्हयाचा पुढील तपास उपनिरीक्षक विक्रम डिगे, पोलीस उप निरीक्षक हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त सागर पाटील,सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक, संगिता यादव, प्रकाश पासलकर यांचे मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रविन्द्र भोसले, संतोष भापकर, निलेश खोमणे, गणेश सुतार, राजु वेगरे, गोपाळ माने, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सावंत, हर्षल शिंदे यांनी केली आहे.