GramPanchayat Election : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मोठी अपडेट; कधी वाजणार बिगुल?
GramPanchayat Election : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका पावसाळा आणि प्रशासकीय विलंबा मुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

GramPanchayat Election : जिल्ह्यातील तब्बल ७५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले असताना या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय प्रक्रिया, पावसाळा आणि खरीप हंगाम लक्षात घेता गावपातळीवरील निवडणुका थेट दिवाळीच्या सुमारास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (GramPanchayat Election)
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत आल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्प्यांमुळे मतदान लांबणीवर जाण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या ७५४ ग्रामपंचायतींसाठी प्रभागरचनेचा प्रारूप मसुदा तहसील स्तरावर जाहीर करण्यात आला आहे.
या मसुद्यावर १३ एप्रिलपर्यंत नागरिकांकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर २१ एप्रिलपर्यंत सुनावण्या होऊन २८ एप्रिलपर्यंत अंतिम प्रभागरचना जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली जाणार आहे. ही अंतिम यादी ४ मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. (GramPanchayat Election)
मात्र, प्रभागरचना अंतिम झाल्यानंतरही निवडणुका लगेच होणे शक्य नाही. आरक्षण सोडत, मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, हरकती व दुरुस्त्या अशा अनेक वेळखाऊ प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. (GramPanchayat Election)
निवडणुकांचा व्याप पाहता खेड तालुक्यात सर्वाधिक ९१ ग्रामपंचायती, भोरमध्ये ७३, शिरूरमध्ये ७१, तर जुन्नर आणि पुरंदरमध्ये प्रत्येकी ६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. बारामतीत ५२ आणि इंदापूरमध्ये ६१ ग्रामपंचायती निवडणुकांच्या प्रतीक्षेत आहेत. (GramPanchayat Election)
मे अखेर किंवा जूनमध्ये निवडणुका घेतल्यास पावसाळा आणि खरीप हंगामामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात या काळात शेतीकामांना प्राधान्य दिले जात असल्याने मतदान टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात निवडणुका घेणे टाळले जाऊ शकते, असे प्रशासनातील सूत्रांचे मत आहे. (GramPanchayat Election)
अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले तरी गावपातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला असून गटबाजी आणि रणनीती आखण्याचे काम सुरू झाले आहे. ४ मेनंतर प्रभागरचना स्पष्ट झाल्यावर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (GramPanchayat Election)





