7/12 Extract : ७/१२ उतारा बंद होणार! शहरी भागातील गावांमध्ये आता ‘प्रॉपर्टी कार्ड’ लागू; सरकारचा मोठा निर्णय
7/12 Extract : महाराष्ट्र सरकारने महापालिका हद्दीतील गावांमध्ये ७/१२ उतारा बंद करून प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे.

7/12 Extract : राज्यातील काही भागांमध्ये पारंपरिक सातबारा (7/12) उतारा बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात निर्देश दिले असून, शहरी हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आता ‘प्रॉपर्टी कार्ड’ (मालमत्ता पत्रक) देण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. (7/12 Extract)
महापालिका किंवा नगरपालिकांच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये जमिनीचे स्वरूप शेतीकडून नागरी वापराकडे वळते. अशा परिस्थितीत सातबाऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड अधिक उपयुक्त आणि कायदेशीरदृष्ट्या सुलभ ठरते, असे सरकारचे मत आहे. या निर्णयासाठी लवकरच अधिकृत आदेश जारी होण्याची शक्यता आहे. (7/12 Extract)
या बदलामुळे मालमत्तेचे व्यवहार सुलभ होणार असून जमीन हस्तांतरण प्रक्रिया अधिक सोपी होईल. तसेच बँकांकडून कर्ज मिळवताना येणाऱ्या अडचणीही कमी होतील. जमिनीच्या नोंदी अधिक सुसूत्र आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. (7/12 Extract)
या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो नागरिक आणि शेतकऱ्यांना होणार असून, ग्रामीण भागातून शहरी व्यवस्थेकडे होणाऱ्या संक्रमणाला गती मिळणार आहे. (7/12 Extract)





