Maharashtra-Goa State Bar Council Election : राज्य वकील परिषद निवडणूकीत जिल्ह्यातील २५ जण रिंगण्यात; ‘या’ दिवशी होणार मतदान
मागील वेळी संपूर्ण २५ जांगासाठी झालेल्या मतदानात जिल्ह्यातील ४ उमेदवार विजयी झाले होते.

Maharashtra-Goa State Bar Council Election – राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या राज्य वकील परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. २४ मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली आणि दमण दीव येथील मिळून १५५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
त्यापैकी २५ उमेदवार पुणे जिल्ह्यातील आहे. मागील कार्यकारिणीमध्ये सदस्य असलेले दोघे रिंगणात आहेत. दोघांनाही परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. मागील वेळी परिषदेच्या कार्यक्षेत्रातून २५ जण निवडून आले होते.
मात्र, यंदा पहिल्यांदाच महिलांना आरक्षण देण्यात आले आहे. २३ जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये १८ जण सर्वसाधारण गटातून विजयी होणार आहेत. तर ५ महिला राखीव गटातून उमेदवार विजयी होणार आहे. निवडणूकीनंतर दोन महिलांची निवड स्विकृत पध्दतीने होणार आहे.
परिषेदासाठी एकुण १ लाख ९० हजार ते १ लाख ९५ हजार वकील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातून २४ ते २५ हजार मतदार आहेत. २५ जण रिंगणात असून, यापैकी किती उमेदवार विजयी होणार हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.
मागील वेळी संपूर्ण २५ जांगासाठी झालेल्या मतदानात जिल्ह्यातील ४ उमेदवार विजयी झाले होते. मात्र, यंदा कमी झालेल्या जागा आणि महिला आरक्षण यामुळे निवडणूकीतील चुरस वाढली आहे. १५५ उमेदवारांचे एकच बॅलेट पेपर आहे. यामध्ये सर्वसाधारण गटातील एक व्यक्ती, महिला राखीव गटातील जागेसाठी अशी दोन मते एका मतदाराला करता येणार आहेत.
पुणे, गोवा वकील परिषदेच्या निवडणूकीसाठी सर्वाधिक उमेदवार हे पुणे जिल्ह्यातून रिंगणात आहेत. २५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
– अॅड. मंगेश लेंडघर, मागील राज्य वकील परिषद निवडणूक उमेदवार






