Maharashtra Farmer : 5 हजार रुपये अग्रीम मदत खात्यात जमा न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
Maharashtra Farmer : महाराष्ट्रातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील ८७ लाख ४५ हजार ६६९ शेतकऱ्यांच्या खात्यांत ४,३७२ कोटी ८३ लाख रुपये जमा. तांत्रिक अडचणी दूर करून उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही पाच हजार रुपये मिळणार.

Maharashtra Farmer : महाराष्ट्रातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणात आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या अग्रीम मदतीचे मोठ्या प्रमाणात वितरण झाले आहे. ५ नोव्हेंबर २०२६ अखेर राज्यातील ८७ लाख ४५ हजार ६६९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत एकूण ४ हजार ३७२ कोटी ८३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पाच हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. अद्याप मदत न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही तांत्रिक अडचणी दूर करून पैसे दिले जाणार आहेत. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना आर्थिक आधार –
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिकांचे नुकसान, शेतीचा वाढता खर्च आणि उत्पन्नातील घट यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. दिवाळीच्या सणाच्या काळात शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम देण्याची ग्वाही दिली होती.
त्यानुसार राज्य सरकारने मदत वितरणाची प्रक्रिया सुरू केली. महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने ही प्रक्रिया राबवली. मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यावर भर देण्यात आला. ५ नोव्हेंबरपर्यंत ८७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळाला आहे.
कोणत्या विभागात किती शेतकऱ्यांना मदत मिळाली?
राज्यातील सहा महसूल विभागांमध्ये दिवाळी अग्रीम मदतीचे वितरण करण्यात आले आहे. विभागनिहाय शेतकरी आणि मदतीची रक्कम पुढीलप्रमाणे आहे.
१. अमरावती विभाग : १२.८२ लाख शेतकऱ्यांना ६४१ कोटी
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील १२ लाख ८२ हजार २०३ शेतकऱ्यांच्या खात्यांत ६४१ कोटी १० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
– अकोला : १ लाख ६२ हजार १५२ शेतकऱ्यांना ८१ कोटी ८ लाख रुपये.
– अमरावती : ३ लाख ६ हजार ७०९ शेतकऱ्यांना १५३ कोटी ३५ लाख रुपये.
– बुलढाणा : ४ लाख २५ हजार ८३३ शेतकऱ्यांना २१२ कोटी ९२ लाख रुपये.
– वाशिम : १ लाख ५९ हजार ५०८ शेतकऱ्यांना ७९ कोटी ७५ लाख रुपये.
– यवतमाळ : २ लाख २८ हजार १ शेतकऱ्यांना ११४ कोटी रुपये.
२. छत्रपती संभाजीनगर विभाग : ३३.३६ लाख शेतकऱ्यांना १,६६८ कोटी
छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळाला आहे. विभागातील आठ जिल्ह्यांमधील ३३ लाख ३६ हजार ३६० शेतकऱ्यांच्या खात्यांत १ हजार ६६८ कोटी १८ लाख रुपये जमा झाले आहेत.
– बीड : ६ लाख १२ हजार ९३ शेतकऱ्यांना ३०६ कोटी ५ लाख रुपये.
– छत्रपती संभाजीनगर : ४ लाख ४४ हजार ३८२ शेतकऱ्यांना २२२ कोटी १९ लाख रुपये.
– धाराशिव : ३ लाख ४७ हजार ७२ शेतकऱ्यांना १७३ कोटी ५४ लाख रुपये.
– हिंगोली : २ लाख १२ हजार ७६० शेतकऱ्यांना १०६ कोटी ३८ लाख रुपये.
– जालना : ४ लाख ३८ हजार ८४४ शेतकऱ्यांना २१९ कोटी ४२ लाख रुपये.
– लातूर : ३ लाख ८१ हजार ९६१ शेतकऱ्यांना १९० कोटी ९८ लाख रुपये.
– नांदेड : ५ लाख ६२ हजार ८६८ शेतकऱ्यांना २८१ कोटी ४३ लाख रुपये.
– परभणी : ३ लाख ३६ हजार ३८० शेतकऱ्यांना १६८ कोटी १९ लाख रुपये.
३. कोकण विभाग : ६३ हजार शेतकऱ्यांना ३१ कोटी
कोकण विभागातील ६३ हजार ६४७ शेतकऱ्यांना एकूण ३१ कोटी ८२ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
– पालघर : ८ हजार २१३ शेतकऱ्यांना ४ कोटी ११ लाख रुपये.
– रायगड : २ हजार २१८ शेतकऱ्यांना १ कोटी ११ लाख रुपये.
– रत्नागिरी : २२ हजार ४९४ शेतकऱ्यांना ११ कोटी २५ लाख रुपये.
– सिंधुदुर्ग : ३० हजार ७२२ शेतकऱ्यांना १५ कोटी ३६ लाख रुपये.
४. नागपूर विभाग : ७.५० लाख शेतकऱ्यांना ३७५ कोटी
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील ७ लाख ५० हजार ४१ शेतकऱ्यांच्या खात्यांत ३७५ कोटी २ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
– भंडारा : १ लाख १५८ शेतकऱ्यांना ५० कोटी ८ लाख रुपये.
– चंद्रपूर : २ लाख ६२९ शेतकऱ्यांना १०० कोटी ३१ लाख रुपये.
– गडचिरोली : ३० हजार ७८८ शेतकऱ्यांना १५ कोटी ३९ लाख रुपये.
– गोंदिया : ७४ हजार ९१० शेतकऱ्यांना ३७ कोटी ४६ लाख रुपये.
– नागपूर : १ लाख ९२ हजार ७६६ शेतकऱ्यांना ९६ कोटी ३८ लाख रुपये.
– वर्धा : १ लाख ५० हजार ७९० शेतकऱ्यांना ७५ कोटी ४० लाख रुपये.
५. नाशिक विभाग : १८.०७ लाख शेतकऱ्यांना ९०३ कोटी
नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमधील १८ लाख ७ हजार ३२ शेतकऱ्यांना ९०३ कोटी ५२ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.
– अहिल्यानगर : ८ लाख ७ हजार २८४ शेतकऱ्यांना ४०३ कोटी ६४ लाख रुपये.
– धुळे : ६५ हजार ९३० शेतकऱ्यांना ३२ कोटी ९७ लाख रुपये.
– जळगाव : ४ लाख ८ हजार ६३५ शेतकऱ्यांना २०४ कोटी ३२ लाख रुपये.
– नंदुरबार : १ लाख ७ हजार ५३४ शेतकऱ्यांना ५३ कोटी ७७ लाख रुपये.
– नाशिक : ४ लाख १७ हजार ६४९ शेतकऱ्यांना २०८ कोटी ८२ लाख रुपये.
६. पुणे विभाग : १५.०६ लाख शेतकऱ्यांना ७५३ कोटी
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील १५ लाख ६ हजार ३८६ शेतकऱ्यांच्या खात्यांत ७५३ कोटी १९ लाख रुपये जमा झाले आहेत.
– कोल्हापूर : ७४ हजार ८९३ शेतकऱ्यांना ३७ कोटी ४५ लाख रुपये.
– पुणे : ३ लाख २८ हजार ५४२ शेतकऱ्यांना १६४ कोटी २७ लाख रुपये.
– सांगली : २ लाख ६ हजार ६०० शेतकऱ्यांना १०३ कोटी ३० लाख रुपये.
– सातारा : ३ लाख १ हजार ४६७ शेतकऱ्यांना १५० कोटी ७३ लाख रुपये.
– सोलापूर : ५ लाख ९४ हजार ८८४ शेतकऱ्यांना २९७ कोटी ४४ लाख रुपये.
बँक खात्यात पैसे जमा न झाल्यास काय होणार?
राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर मदत वितरित केली असली, तरी काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत अद्याप रक्कम जमा झालेली नाही. बँक खात्याच्या तपशिलातील चुका, खाते क्रमांकातील त्रुटी किंवा अन्य तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा होण्यास विलंब झाला आहे.
अशा शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून कार्यवाही सुरू आहे. तांत्रिक त्रुटी दूर झाल्यानंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. राज्यातील एकही पात्र शेतकरी या मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.
सरकारकडून मदत वितरणाच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येत असून, उर्वरित शेतकऱ्यांपर्यंतही मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.





