Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराची कोंडी फुटणार? शिंदेंना महसूल तर, अजितदादांना गृहनिर्माण? कसा असणार फॉर्म्युला

Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील शपथ घेतली. आता सध्या खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा सुरू आहे. यातच आता 14 तारखेला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.
विधिमंडळाचे अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यानुसार महायुतीच्या नेत्यांनी यापूर्वीच हिवाळी अधिवेशनाच्या होईल, असे सांगितले होते. मुंबईतील वर्षा बंगल्यावर रविवारी रात्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीनंतर मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाच्या चर्चेचा वेग आला आहे.
अश्यातच एक महत्वाची बातमी समोर आली असून, शिवसेनेला महसूल आणि राष्ट्रवादीला गृहनिर्माण खातं देण्यास भाजप तयार झालंय असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप स्वतःकडं नगरविकास, गृह, सामान्य प्रशासन, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, ओबीसी कल्याण ही खाती ठेवण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीला वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालविकास, मदत आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही खाती दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
तसेच, शिंदेंच्या शिवसेनेला महसूल सार्वजनिक बांधकाम खात्यासह शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कामगार, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता ही खाती दिली जाऊ शकतात.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी इच्छुकांना आशा आहे.





