अखेर खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरला? ; भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणते खाते पडणार?, संभाव्य यादी समोर

Maharashtra Cabinet Expansion । सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला आहे. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी अजूनही मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. असे असताना आता एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे महायुती सरकारचा खातेवाटपाच फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे.
महायुतीच्या नवीन मंत्र्यांना त्यांच्या खातेवाटपसंबंधी येत्या 24 तासांत निर्णय कळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या खातेवाटपासाठी शिवसेनेची यादी काल रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची यादी आज दिली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांत राज्यपालांना देणार संपूर्ण खाते वाटपाची यादी देणार असल्याचे बोलले जात आहे.
खातेवाटपाचा फॉर्म्युला कसा असेल ? Maharashtra Cabinet Expansion ।
मागील मंत्रिमंडळीतील महत्वाची खाती ही त्या पक्षाकडे देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. तर गृह भाजपकडे, तर नगरविकास खातं शिवसेनेकडे राहणार आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा भाजपस्वतःकडेच ठेवणार असून तर शिवसेनेचे उत्पादन शुल्क खातं आणि राष्ट्रवादीला दिले जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळातील खातेवाटपात महत्वाचा बदल होणार आहे. तो म्हणजे भाजपच्या वाटेचे गृहनिर्माण खातं शिवसेनेच्या ताब्यात जाणार आहे. महिला व बालविकास देखील राष्ट्रवादीकडेच राहणार आहे, अदिती तटकरेंची पुन्हा या मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नव्या फॉर्म्युल्यानुसार कोणाला कोणती खाती मिळणार? Maharashtra Cabinet Expansion ।
भाजप
गृह
महसूल
सार्वजनिक बांधकाम
पर्यटन
ऊर्जा
शिवसेना
नगरविकास
गृहनिर्माण
राष्ट्रवादी काँग्रेस
अर्थ
महिला आणि बालविकास
उत्पादन शुल्क
दरम्यान , हा जरी फॉर्म्युला ठरला असला तरी महायुतीत अजूनही काही नाराज नेतेमंडळी आहेत ज्यांची मनधरणी सध्या तिन्ही पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या २४ तासात या संभाव्य यादीत आणखी काही बदल होणार का हे पाहणे गरजेचे आहे.
हेही वाचा
बांगलादेशचा आणखी एक खोडसाळपणा ! पश्चिम बंगाल, आसाम अन् त्रिपुराला दाखवला त्यांच्या देशाचा भाग ; वादग्रस्त नकाशा प्रसिद्ध करत दिली धमकी
NCP Symbol Hearing : तारीख पे तारीख ! ‘घड्याळा’चा फैसला नवीन वर्षातच होणार, न्यायालयाने काय सांगितलं पाहा…





