मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर महायुतीत नाराजीनाट्य ; तानाजी सावंत अधिवेशन सोडून अचानक गायब ?

Maharashtra Cabinet Expansion। राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल नागपूरमधील राजभवनात पार पडला. यावेळी महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेना शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातील सर्वात वरचे नाव म्हणजे तानाजी सावंत यांचे आहे. शिवसेना शिंदे गटाचे परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत तानाजी सावंत यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसल्याने ते नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
अधिवेशन सोडून तानाजी सावंत नागपूर बाहेर Maharashtra Cabinet Expansion।
तानाजी सावंत नागपूरमध्ये शपथविधी सुरु असताना राजभवनाकडे आले देखील नसल्याचे सांगण्यात येत आहे. काल तानाजी सावंत हे नागपूरच्या रेडिसन्स ब्लू हॉटेलमधून बॅग पॅक करुन निघून गेले असल्याची माहिती समोर येत आहे. आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार असल्याने सर्व आमदारा नागपुरात दाखल झाले आहेत .असे असताना तानाजी सावंत माघारी परतले होते. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. तब्येत ठीक नसल्याने तानाजी सावंत पुण्याला परतल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली.
तानाजी सावंत नागपूरहून अचनाक गायब ? Maharashtra Cabinet Expansion।
तब्येत ठीक नसल्याने परतल्याची तानाजी सावंत यांच्या ऑफिसने माहिती दिली. कोलेस्ट्रॉल वाढल्याने डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला दिल्याचे सांगितले आहे. तसेच आपण नाराज नसल्याचे तानाजी सावंत यांच्याकडून सांगण्यात येत आहे. सध्या तानाजी सावंत पुण्यात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, तानाजी सावंतच नाही तर महायुतीचे अनेक नेते नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
हेही वाचा
“परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई नको पण” ; मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश





