Maharashtra Cabinet : राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय; फडणवीस सरकारने घेतले मोठे निर्णय
Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मंगळवारी मंत्रालयात पार पडली. या बैठकीत उच्च शिक्षण, सुरक्षा यंत्रणा आणि पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित चार महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.

Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाची आठवड्याची बैठक मंगळवारी मंत्रालयात झाली. यावेळी चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आले. राज्यातील उच्च व तंत्र शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Maharashtra Cabinet)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रात होऊ घातलेले बदल लक्षात घेऊन सुधारणा करण्यात येणार आहे. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet)
तसेच पालघर जिल्ह्याबाबत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा करुन पालघर जिल्ह्याचा आता झोन-1 मध्ये समावेश करण्यात आला आहे. (Maharashtra Cabinet)
झोन-4 वर्गवारी रद्द आणि विस्तारीकरण नियमातही बदल करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यासाठी पालघर येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय तसेच मुख्य दंडाधिकारी न्यायालयाची स्थापना होणार आहे. सरकारी वकील कार्यालयांसह अनुषांगिक पदांच्या निर्मितीस मंजुरी देण्यात आली. (Maharashtra Cabinet)
राष्ट्रवादीच्या आमदारांचा महिन्याचा पगार दुष्काळग्रस्तांना
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने राष्ट्रवादी पक्षाच्या विधानसभा व विधान परिषदेतील सर्व आमदारांनी आपले एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Cabinet)
त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या वेतनाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. राज्यातील शेतकरी बांधव सध्या दुष्काळाच्या संकटाचा सामना करत आहेत. (Maharashtra Cabinet)
अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देणे, हीच स्वर्गीय अजितदादांनी आपल्याला दिलेली शिकवण आहे. शेतकरी बांधवांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शक्य ते सर्व योगदान देणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. (Maharashtra Cabinet)
राज्यातील शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध राहील, असे सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले. (Maharashtra Cabinet)





