Maharashtra Drought : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; दुष्काळाच्या निकषात न बसणाऱ्या तालुक्यांनाही मदत, प्रत्यक्ष पाहणीनंतर निर्णय घेणार
Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने शेतकरी हिताचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तांत्रिक निकषांमध्ये न बसल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत, यासाठी अशा तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष जमीन पाहणी करून मदत देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. (Maharashtra Drought)
फडणवीस यांनी सांगितले की, काही तालुक्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, ते दुष्काळाच्या ‘ट्रिगर’ निकषांमध्ये बसत नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी ‘ट्रिगर-२’मधील निकषांचाही विचार केला जाणार आहे. तरीही निकष पूर्ण होत नसतील, तर प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी करून विशेष बाब म्हणून दुष्काळाचे लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Maharashtra Drought)
दरम्यान, राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या तालुक्यांमध्ये पीक नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची प्रक्रिया सुरू आहे. (Maharashtra Drought)
मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या नियमित बैठका घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच समाविष्ट न झालेल्या तालुक्यांबाबत पर्यायी निकषांच्या आधारे मदतीचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. (Maharashtra Drought)
‘तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये’, अशी भूमिका फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनाम्यांच्या आधारे पुढील मदतीचा निर्णय घेतला जाणार आहे. (Maharashtra Drought)





