Maharashtra Police : महाराष्ट्र सरकारचा पोलिसांसाठी मोठा निर्णय; धाडसी कामगिरी करणाऱ्यांना मिळणार ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’
Maharashtra Police : कर्तव्य बजावताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अत्यंत साहसी व धाडसी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

Maharashtra Police : कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून साहसी आणि धाडसी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अशा पोलिसांना आता ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देऊन गौरविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. (Maharashtra Police)
या सन्मानांतर्गत शौर्य पदक मिळवणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पोलिसांसाठी मरणोत्तर शौर्य पदकाचीही तरतूद करण्यात आली आहे. (Maharashtra Police)
दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा
मुख्यमंत्री शौर्य पदकासाठी वर्षभरातील पोलिसांच्या साहसी कामगिरीचा विचार केला जाणार आहे. या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला करण्याची तरतूद आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2026 पासूनची कामगिरी विचारात घेतली जाणार असल्याचे मंत्रिमंडळ निर्णयात नमूद करण्यात आले आहे. (Maharashtra Police)
अशी असेल निवड प्रक्रिया
मुख्यमंत्री शौर्य पदकासाठी प्रस्तावांची छाननी आणि निवड करण्यासाठी समित्यांची रचना करण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक निवड समिती काम करणार आहे. (Maharashtra Police)
जिल्हास्तरावरून पोलीस अधीक्षक संबंधित विशेष पोलीस महानिरीक्षकांमार्फत प्रस्ताव पाठवतील. पोलीस आयुक्तांकडून प्रस्ताव थेट पोलीस महासंचालकांकडे सादर केले जातील. त्यानंतर गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रस्तावांचा विचार करेल. अंतिम प्रस्ताव गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला जाणार आहे. (Maharashtra Police)
मंत्रिमंडळाने या योजनेसाठी निवड पद्धती, समित्यांची रचना आणि संबंधित खर्चाच्या तरतुदींनाही मंजुरी दिली आहे. राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साहसी कामगिरीला राज्यस्तरावर स्वतंत्रपणे गौरविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे. विशेषतः जोखीम पत्करून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. (Maharashtra Police)
Maharashtra Police : पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांना ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर
Maharashtra Police : राज्यात पोलिसांचे डिजिटल पेट्रोलिंग; आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच






