Maharashtra Police : पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांना ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर
Maharashtra Police : ठाणे पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांना उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर; १५ ऑगस्टला सन्मान.

Maharashtra Police : देवसडे (ता. नेवासा) येथील मूळ रहिवासी आणि आयपीएस अधिकारी, ठाणे पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांना उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या दीर्घकालीन आणि निष्कलंक सेवेची दखल घेऊन ‘उत्कृष्ट सेवा पदक’ आणि ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्याचे जाहीर केले आहे. ही पदके प्रदान करण्याचे अधिकार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र पोलीस दलातील दीर्घकालीन, निष्कलंक, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेऊन अधिकारी व अंमलदारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही पदके दिली जातात. याच अनुषंगाने डॉ. पंजाबराव उगले यांची ‘अति-उत्कृष्ट सेवा पदका’साठी निवड करण्यात आली आहे.





