Maharashtra Budget 2026 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली जबाबदारी स्वीकारत, मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे बजेट मांडले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी यंदाचे वर्ष ‘सामाजिक, समता व समरस्ता वर्ष’ म्हणून साजरे करण्याची घोषणा केली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्माला २०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष समिती आणि निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तेथे पायाभूत सुविधांचा विकास आराखडा राबवण्यात येणार आहे. Maharashtra Budget संत गाडगेबाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ आणि कर्मभूमी जोडून ‘तीर्थक्षेत्र सर्किट’ विकसित करण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ग्रामीण विकासासाठी ‘संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान’ सुरू करण्यात येईल. विशेष म्हणजे, ७५ गावांमध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) वापरून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा : (Maharashtra Budget 2026) १ – ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान. २ – दिवंगत अर्थमंत्री अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार आणि त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरू करणार. ३ – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अखंडित सुरू राहणार. अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद. ४ – राज्यात १,२०० किमी मेट्रो मार्ग आणि ६,००० किमी द्रुतगती मार्ग विकसित करणार. मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनसाठी तरतूद. ५ – नवीन गुंतवणूक धोरणातून ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट. गडचिरोली नवे ‘स्टील हब’ होणार. ६ – मुंबईत ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ आणि राज्यात २९५ हून अधिक गेमिंग स्टुडिओ उभारणार. ७ – सातारा वासोटा किल्ल्यावर रोप-वे आणि नागपूर (रामटेक) येथे तिसरी चित्रसृष्टी उभारणार. ८ – ‘गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत’ आता शेतमजुरांचाही समावेश; नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात. हे देखील वाचा… Maharashtra Budget 2026 : अजितदादांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?