Maharashtra Budget 2025 | नव्या औद्योगिक धोरणातून ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असेल – अजित पवार

Maharashtra Budget 2025 | राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या आवारातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी त्यांनी राज्याच्या शाश्वत विकासाचा रुपरेषा हातात घेण्यात आली आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र व्हावे असा मोदींचा संकल्प आहे. त्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची कामगिरी करेल, असे म्हणत अर्थसंकल्पीय भाषणाला सुरूवात केली. Maharashtra Budget 2025 |
५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट
यावेळी अजित पवारांनी राज्याचं नवं औद्योगिक धोरण २०२५ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याच सांगितले आहे. पाच वर्षांच्या कालावधीत ४० लाख कोटींची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असेल. यासोबत आकाश व संरक्षण क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स अँड ज्वेलरी धोरण, सूक्ष-लघू-मध्यम उपक्रम धोरण, चक्रिय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करण्यात येणार आहे. नवे कामगार नियम होणार आहेत. तसेच राज्यात ३७ विशेष आर्थिक क्षेत्रे विकसित केली जाणार असल्याचेही अजित पवारांंनी सांगितले आहे. Maharashtra Budget 2025 |
१५ लाख ६५४ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार
अजित पवार यांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्याची माहिती देखील दिली आहे. “शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळे देशी आणि परदेशी गुंतवणुकीत वाढ होत आहे. त्यामुळे रोजगार वाढत असून उत्पन्नात वाढ होत आहे. येत्या काळात १५ लाख ६५४ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. १६ लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. आपण १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार केला आहे. या कार्यक्रमामुळे प्रशासन पारदर्शी होणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा:
‘मतदार यादीतील अनियमिततेवर आम्हाला चर्चा हवी’ ; राहुल गांधींचे लोकसभेत आवाहन





