Maharashtra Assembly Monsoon Session : देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषद सभागृह नेतेपदी नियुक्ती
Updated On:

मुंबई : विधानपरिषद सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृह नेतेपदी नियुक्ती केल्याची घोषणा विधानपरिषदेत केली.
दरम्यान, त्याआधी विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला ‘वंदे मातरम्’ ने सुरुवात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.





