Maharashtra Assembly Elections 2024; निवडणुकीचं बिगूल वाजलं ! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, एका शब्दात म्हणाले….

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल आज अखेर वाजलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी जास्त महत्त्वाची आहे.
कारण महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या घडामोडींवर जनतेच्या मनात नक्की आहे ते जाणून घेण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.
आज (दि. 15) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. तसेच, 4 नोव्हेंबरला निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक असणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत फडणवीसांनी एकाच शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “शंखनाद” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे. यासोबतच एक व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे.
शंखनाद 🐚#Maharashtra #AssemblyElections2024 #Elections2024 #MaharashtraElection2024 pic.twitter.com/LdLPIlU5J9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 15, 2024
महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती?
महाराष्ट्रात एकूण मतदान केंद्र – 1 लाख 186
ग्रामीण मतदान केंद्र – 57 हजार 601
शहरी मतदार केंद्र – 42 हजार 582
एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख
दिव्यांग – 6 लाख 2 हजार
नवमतदार – 1. 85 कोटी
पुरुष मतदार – 4.97 कोटी
महिला मतदार – 4.66 कोटी
भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले :
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. या निवडणुकीत भाजप 105 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील एकसंध शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि 44 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आले होते.





