Maharashtra Assembly Elections 2024 : ‘मविआ’च्या राधानगरीतील उमेदवाराचा सस्पेन्स कायम; कुणाच्या गळ्यात पडणार उमेदवारीची माळ? पाहा….

Maharashtra Assembly Elections 2024 – राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. महायुतीतून महाविकास आघाडीकडे वळालेल्या माजी आमदार के. पी. पाटील किंवा ए. वाय. पाटील यांच्या गळ्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारीची माळ पडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून हालचालींना वेग आला आहे. ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणाच्या नावाला पसंती देणार? याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच घडणा-या घडामोडींमुळे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक अस्वस्थ झाले असून त्यांनी मुंबईकडे धाव घेतली आहे.
राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून माजी आमदार के. पी. पाटील यांना उमेदवारी मिळेल, असा दावा पाटील यांच्याकडूनच केला जात आहे.
दुसरीकडे ए. वाय. पाटील हेच राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असा छातीठोकपणे दावा स्वत: ए. वाय. पाटील करत आहेत.





