Maharashtra Assembly Elections 2024 – लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार गटात जोरदार इनकमिंग सुरु आहे. गेल्या चार महिन्यांत दोन डझन पेक्षा जास्त दिग्गज नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यात विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर अनेक नेते गळाला लावून शरद पवार सत्ताधारी पक्षांना धक्का देत आहे. त्यात आता मुंबईतील भाजपचे दिग्गज नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे. नवी मुंबईत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 2२) संदीप नाईक यांचा प्रवेश पार पडणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. संदीप नाईक यांना बेलापूर मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हा पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. संदीप नाईक यांचे वडील गणेश नाईक महायुतीचे ऐरोली विधानसभेचे उमेदवार तर संदीप नाईक बेलापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असेही बोलले जात आहे. दरम्यान, गणेश नाईक हे एकेकाळी कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख होती. ते बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जायचे. त्यानंतर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले होते. शरद पवारांचे समर्थक म्हणूनही त्यांनी ओळखन निर्माण केली होती. दरम्यान 2019 मध्ये राज्यात भाजपची लाट असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान आता त्यांचे पुत्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत.