Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी भाजपला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात कोणते सरकार येणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र त्या अगोदरच भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
पक्षप्रवेशावेळी सचिन शिंदे काय म्हणाले?
मी गेल्या 20 वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. मी पक्षवाढीसाठी काम केलं. पण मला योग्य तो न्याय मिळाला नाही. मी उद्धव ठाकरेंना भेटलो. मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. कार्यकर्ते परिस्थितीनुसार माझ्यासोबत उभे आहेत, असे सचिन शिंदे पक्षप्रवेशावेळी म्हणाले. निकालात काही तास असताना हा पक्षप्रवेश झाल्याने महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
सचिन जी तुमचं स्वागत आहे. तुम्ही व्यथा मांडलीत मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्यावर अन्याय होणार नाही. आपण उद्याची वाट बघतोय. काल जो बॉम्ब फुटला तो 4 दिवस आधी फुटला असता बर झालं असतं. घोटाळेबाजांच काय करणार ते केंद्र सरकार बघेल. नोटांचा बॉम्ब वसई विरारला फुटला ते सर्वांनी पाहिलं. सचिन जी तुमच्या मनात जे काही करायचंय ते मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.





