Maharashtra Election : महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Assembly Elections 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष आपले उमेदवार जाहीर करताना दिसत आहेत. जवळपास बहुतांश मतदारसंघातील लढती आता निश्चित झाल्या आहेत. या निवडणुकीत महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीची साथ सोडत स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर रासपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 65 जणांना स्थान देण्यात आले आहे.
महादेव जानकरांच्या 65 उमेदवारांची पहिली यादी
गंगाखेड – डॉ. रत्नाकर माणिकराव गुट्टे
अहमदपूर – बब्रुवान खंदाडे
भोकर – साहेबराव बाबा गोरटकर
कळम धाराशिव – श्रीहरी वसंत माळी
परांडा – डॉ. राहुल भीमराव घुले
परभणी – सावित्री सतीश महामुनी चकोर
मुखेड – विजयकुमार भगवानराव पेठकर
हदगाव हिमायतनगर – ॲड. संतोष उत्तमराव टीकोरे
नायगाव – हनुमंतराव मारोतराव वनाळेकर
बारामती – संदीप मारुती चोपडे
अक्कलकोट – सुनील शिवाजी बंडगर
राहुरी – नानासाहेब पंढरीनाथ जुंधारे
अंबरनाथ – रुपेश थोरात
निलंगा – नागनाथ बोडके
इंदापूर – तानाजी उत्तम शिंगाडे
देगलूर – श्याम बाबुराव निलंगेकर
पैठण – प्रकाश उत्तमराव दिलवाले
वैजापूर गंगापूर – बाबासाहेब कचरू राशिनकर
कराड उत्तर – सोमनाथ रमेश चव्हाण
पुरंदर – संजय शहाजी निगडे
भोर – रामचंद्र भगवान जानकर
खानापूर आटपाडी – उमाजी मोहन चव्हाण
कोल्हापूर दक्षिण – विशाल केरू सरगर
पन्हाळा शाहूवाडी – अभिषेक सुरेश पाटील
इचलकरंजी – प्रा. सचिन किरण बेलेकर
सातारा – शिवाजी भगवान माने
आंबेगाव – योगेश पांडुरंग धरम
कोथरूड – सोनाली उमेश ससाणे
कसबा पेठ – शैलेश रमेश काची
वडगाव शेरी – सतीश इंद्रजीत पाण्डेय
मागाठाणे – जिवाजी लेंगरे
जोगेश्वरी पूर्व – विजय पतिराम यादव
कांदिवली – ओमप्रकाश सोनार
दिंडोशी – राकेश लालमनी यादव
नालासोपारा – नरसिंह रमेश आदावळे
वसई – हरिशंकर शेषनारायण जयस्वाल
सांगोला – सोमा उर्फ आबा गुलाब मोटे
वर्सोवा – मेहक चौधरी
बार्शी – किशोर परमेश्वर गाडेकर
करमाळा – विकास शिवाजी आलदर
पनवेल – सुदाम शेठ जरग
भोसरी – परमेश्वर बुरले
अकोले – पांडुरंग नानासाहेब पथवे
साक्री – अनिता धनराज बागुल
ब्रह्मपुरी – संजय शंकर कन्नवार
कर्जत – बळीराम एडकर
देवळी – अश्विनी गोविंद शिरपूरकर
मलकापूर – प्रवीण लक्ष्मण पाटील
रिसोड – दीपक श्रीराम तिरके
अकोला पश्चिम – इमरान मिर्झा
बाळापुर – विश्वनाथ जावरकर
सिंदखेडराजा – दत्तू रामभाऊ चव्हाण
यवतमाळ – धरम दिलीपसिंग ठाकूर
दिग्रस – डॉ. श्याम फुलसिंग चव्हाण
उमरखेड – प्रज्ञेश रुपेश पाटील
बडनेरा – संजय महाजन
कारंजा मानोरा – संतोष हरिभाऊ दुर्गे
कामठी – नफीस अब्दुल अलीम शेख
निफाड – शंकर एकनाथ साबळे
अकोले – पांडुरंग नानासाहेब पथवे
शिर्डी- नानासाहेब सोन्याबापू काटकर
कोपरगाव – शंकर सुखदेव लासुरे
नेवासा – शशिकांत भागवत मतकर
कर्जत जामखेड – विकास मिठूलाल मासाळ
पारनेर- सखाराम मालोजी सरक
या यादीमध्ये मुंबई, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील जागांचा समावेश आहे. तसेच उर्वरित उमेदवारांची यादी आज रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





