Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मतदान , जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर…

Updated On:

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे.

सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात होता.

दरम्यान, आज (दि. 15) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. 4 नोव्हेंबरला निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. तर, 29 ऑक्टोबरला अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. आणि अर्जाची छाननी 30 ऑक्टोबरला करण्यात येईल. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक असणार आहे.

महाराष्ट्रात एकूण मतदार 9.63 कोटी मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या 4.97 कोटी इतकी आहे. तर 4.66 कोटी या महिला मतदार आहेत. यात 20.99 लाख लोक हे पहिल्यांदा मतदान करणार आहे. तसेच वरिष्ठ नागरिक आपल्या घरून देखील मतदानाचा हक्क बजावू शकतील. असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती?

महाराष्ट्रात एकूण मतदान केंद्र – 1 लाख 186

ग्रामीण मतदान केंद्र – 57 हजार 601

शहरी मतदार केंद्र – 42 हजार 582

एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख

दिव्यांग – 6 लाख 2 हजार

नवमतदार – 1. 85 कोटी

पुरुष मतदार – 4.97 कोटी

महिला मतदार – 4.66 कोटी

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. या निवडणुकीत भाजप 105 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील एकसंध शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि 44 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आले होते.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात