Maharashtra Assembly Elections 2024 : निवडणुकांची घोषणा होताच अजित पवारांकडून कामाचा अहवाल सादर; म्हणाले, “निर्णायक क्षण आला…’

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल आज अखेर वाजलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी जास्त महत्त्वाची आहे.
कारण महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या घडामोडींवर जनतेच्या मनात नक्की आहे ते जाणून घेण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.
आज (दि. 15) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. तसेच, 4 नोव्हेंबरला निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक असणार आहे.
दरम्यान, राज्यातील निवडणुकांचे वेळापत्रक समोर येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत आपल्या दोन वर्षांचा काळातील लेखाजोखा जनतेसमोर मांडला आहे.
अजित पवारांचे ट्विट !
मागच्या दोन वर्षांचे आमचे कामं महाराष्ट्राच्या जनतेसमोर ऐतिहासिक अर्थसंकल्प, विकासाची नवी उंची, लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी या आणि अश्या अनेक लोकोपयोगी योजनांच्या आणि निर्णयांच्या माध्यमातून उभे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक सहकाऱ्याने या योजना प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आता निर्णायक क्षण आला आहे.
मागच्या दोन वर्षांचे आमचे कामं महाराष्ट्राच्या जनतेसमोर ऐतिहासिक अर्थसंकल्प, विकासाची नवी उंची, लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी या आणि अश्या अनेक लोकोपयोगी योजनांच्या आणि निर्णयांच्या माध्यमातून उभे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक… pic.twitter.com/xRD2s1gcia
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 15, 2024
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, मौलाना आझाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातील प्रत्येक घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध आहे. आपण पुढे येऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र लढूया आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया. जय महाराष्ट्र!
देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया !
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत फडणवीसांनी एकाच शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “शंखनाद” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे. यासोबतच एक व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे.
शंखनाद 🐚#Maharashtra #AssemblyElections2024 #Elections2024 #MaharashtraElection2024 pic.twitter.com/LdLPIlU5J9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 15, 2024





