Maharashtra Assembly Election 2024 । राज्यात ११ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी आली समोर आली आहे. यामध्ये गडचिरोलीत सर्वाधिक 30 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. तर नांदेडमध्ये सर्वाधिक कमी 13.67 टक्के मतदान झालं आहे. राज्यातील विधासभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आता ४ तासात मतदानाची टक्केवारी समोर आलीय. सकाळी ११ पर्यंत १८.१४ टक्के मतदान झाले असून आणखी भरघोस मतदान करण्यासाठी सर्वांनी घराबाहेर पडा, मतदान करा, असे नेत्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत महाराष्ट्रात १८.१४ टक्के मतदान झालं आहे. त्यात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक ३० टक्के मतदान झाल्याचं समोर आलं आहे. परभणी विधानसभा मतदारसंघात सकाळी 11 पर्यंत 19.62 टक्के मतदान झालं. तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघात 16.85 टक्के , पाथरी येथे 20.61 टक्के मतदान झालं. तसंच जिंतूर – सेलू विधानसभा सकाळी 7 ते 9 17.12 टक्के दरम्यान , राज्यात सकाळी 9.30 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान झालं आहे. मतदानाची टक्केवारी खूपच कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करा अशी विनंती अनेक सेलिब्रिटींनी केलं. दरम्यान, आजच्या मतदासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी मतदान केले आहे. जिल्हानिहाय मतदान टक्केवारी खालीलप्रमाणे आहे- अहमदनगर-18.24% अकोला-16.35% अमरावती-17.45% छत्रपती संभाजीनगर-18.98% बीड-17.41% भंडारा-19.44% बुलढाणा-19.23% चंद्रपूर-21.50% धुळे-20.11% गडचिरोली-30.00% गोंदिया-23.32% हिंगोली-19.20% जळगाव-15.62% जालना-21.29% कोल्हापूर-20.59% लातूर-18.55% मुंबई शहर-15.78% मुंबई उपनगर-17.99% नागपूर-18.90% नांदेड-13.67% नंदुरबार-21.60% नाशिक-18.71% उस्मानाबाद-17.07% पालघर-19.40% परभणी-18.49% पुणे-15.64% रायगड-20.40% रत्नागिरी-22.93% सांगली-18.55% सातारा-18.72% सिंधुदुर्ग-20.91% सोलापूर-15.64% ठाणे-16.63% वर्धा-18.86% वाशिम-16.22% यवतमाळ-19.38%