पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत येथील मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवून मला निवडून दिले. या आमदारकीच्या जेमतेम दीड वर्षाच्या काळात आपण या मतदारसंघात जे काम केले त्यामुळे मतदारांचा आपल्यावरील विश्वास आणखीनच दृढ झाला असून, त्यातूनच आपल्याला पुन्हा पाच वर्षासाठी निवडून देण्याचा निर्णय येथील मतदारांनी घेतला असा विश्वास काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.
कसबा मतदार संघात जो विकासाचा मोठा बॅकलॉग राहिला आहे तो येत्या पाच वर्षात आपण निश्चित भरून काढू असेही ते म्हणाले. धंगेकर यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक १७ मध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धंगेकर यांनी मतदारांशी संवाद साधला.
दयात्रेत रवींद्र माळवदकर, वीरेंद्र किराड, चंद्रकांत मिठापल्ली, रवि रच्चा, विशाल धनवडे, सुनील पडवळ, नितीन गोंधळे, हेमंत येवलेकर, भाई कात्रे, योगेश आंदे, विशाखा निंबाळकर, शिवराज माळवदकर यांच्यासहकॉंग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पक्ष आणि अन्य मित्र पक्षांचे पदाधिकारी यावेळी पदयात्रेत सहभागी झाले होते.
कामगार मैदानापासून पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी पद्मशाली समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना समर्थन देण्यात आले. त्यानंतर ही पदयात्रा पालखी विठोबा मंदिर, डोके तालीम, घोडेपीर, नाना चावडी चौक, हिंदमाता चौक, कुंभारवाडा, रामोशी गेट, बनकर तालीम, घसेटी पूल, सतरंजीवाला चौक, तांबोळी मशीद, नेहरू चौक आदी मार्गाने काढण्यात आली.