Maharashtra Assembly Election 2024 : ‘अजून मुलगा जन्माला आला नाही, त्याचा लग्नाचा विचार करता…’; राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर प्रफुल्ल पटेल यांची खोचक टीका

Praful Patel । Raj Thackeray | Maharashtra Assembly Election 2024 – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या विधानाने मतमोजणी पूर्ण होण्याआधीच एकाप्रकारे निवडणुकीचा निकाल जाहीर केला आहे. 2024 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असून हा आपला अंदाज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
2024 मध्ये मुख्यमंत्री भाजपचाच होईल, तर 2029 मध्ये मुख्यमंत्री हा मनसेचा असेल, असा दावाही राज ठाकरे यांनी केला. एका टीव्ही कार्यक्रमांमध्ये राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं होत.
त्यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीममधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या या विधानावर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी खोचक टोमणा मारला आहे. ‘त्यावर मला इतकच म्हणायचे आहे की आधी कोणाचे किती जागा निवडून येतात त्याचा विचार करणे योग्य आहे. अजून मुलगा जन्माला आला नाही त्याचा लग्न आणि साक्षगंध कुठे करायचं हे योग्य नाही’ असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी लगावला.
महाविकास आघाडी सत्तेत येणार नाही – प्रफुल्ल पटेल
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या रस्सीखेच संदर्भात प्रफुल पटेल यांना प्रश्न केले असता महाविकास आघाडी सत्तेतच येणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.
तर महाविकास आघाडी मध्ये मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच काल्पनिक आहे.. एक पक्षांमध्ये तीन-तीन दावेदार त्यांच्याकडे आहेत. तर तुमच्याकडे इतके प्रबल दावेदार आहेत तुम्ही नाव जाहीर का करत नाही.. असाही सवाल पटेल यांनी विचारला.
आदित्य बाबतचा निर्णय माझा होता – राज ठाकरे
राज ठाकरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळीमध्ये मनसेचा उमेदवार उभा केला नव्हता. मात्र, 2024 निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी माहीम मतदारसंघात पुतण्या अमित ठाकरे विराधोत उमेदवार दिला आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंसाठी मी विचार केला. विरोधातील पक्ष असला तरी मी राजकारण आणि नातेसंबंध जपत असतो. राजकारणाशी कौटुंबिक संबंध ठेवण्याची प्रेरणा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळाली. आदित्य ठाकरे निवडणूक लढतोय, म्हणून आपण उमेदवार नको देऊया, असे मला वाटले. मला त्याचा पश्चाताप नाही, असेही ते म्हणाले.





