राज्यात सकाळी 9.30 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान

Maharashtra Assembly Election 2024 । राज्यात सकाळी 9.30 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान झालं आहे. मतदानाची टक्केवारी खूपच कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करा अशी विनंती अनेक सेलिब्रिटींनी केलं. दरम्यान, आजच्या मतदासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी मतदान केले आहे.
6.03% voter turnout recorded till 9 am for the Lok Sabha by-elections to Nanded, Maharashtra. pic.twitter.com/hob3yDz5qt
— ANI (@ANI) November 20, 2024
राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. अहमदनगर – ५.९१ टक्के,अकोला – ६.० टक्के,अमरावती -६.६ टक्के, औरंगाबाद-७.५ टक्के, बीड -६.८८ टक्के, भंडारा- ६.२१ टक्के, बुलढाणा- ६.१६ टक्के, चंद्रपूर-८.५ टक्के,धुळे -६.७९ टक्के, गडचिरोली-१२.३३ टक्के, गोंदिया -७.९४ टक्के, हिंगोली -६.४५ टक्के, जळगाव – ५.८५ टक्के, जालना- ७.५१ टक्के, कोल्हापूर-७.३८ टक्के,लातूर ५.९१ टक्के, मुंबई शहर-६.२५ टक्के, मुंबई उपनगर-७.८८ टक्के,नागपूर -६.८६ टक्के,नांदेड -५.४२ टक्के, नंदुरबार-७.७६ टक्के,नाशिक – ६.८९ टक्के, उस्मानाबाद- ४.८५ टक्के, पालघर-७.३० टक्के, परभणी-६.५९ टक्के,पुणे – ५.५३ टक्के,रायगड – ७.५५ टक्के, रत्नागिरी-९.३० टक्के,सांगली – ६.१४ टक्के,सातारा – ५.१४ टक्के, सिंधुदुर्ग – ८.६१ टक्के,सोलापूर – ५.७,ठाणे ६.६६ टक्के,वर्धा – ५.९३ टक्के,वाशिम – ५.३३ टक्के,यवतमाळ – ७.१७ टक्के मतदान झाले आहे.
…….
मागच्या चार आठवड्यांपासून राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु होती. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तर आज बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये मतदान होत असून यावेळच्या मतदानाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान ,राज्यात एकूण 4 हजार 136 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. तर शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, पक्ष फुटीनंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूका पार पडत आहेत. यासाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला होता. यातच आता महायुती आणि महाविकास आघाडीनेही कंबर कसल्याचं दिसून आले.





