मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क ; म्हणाले, “महायुती प्रचंड बहुमताने जिंकेल”

Maharashtra Assembly Election 2024 । मागच्या एका महिन्यापासून राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु होती. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तर आज बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये मतदान होत असून यावेळच्या मतदानाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहाणं महत्त्वाचं आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या सर्व परिवारासह मतदानाचा हाक बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना घराभाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले.
मतदान केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आज लोकशाहीचा सण आहे आणि सर्वांनी सहभागी होऊन मतदान केले पाहिजे आणि यातूनच महाराष्ट्र, लोकशाही बळकट होईल. 2019 मध्ये जे झाले ते जनता विसरलेली नाही, जनादेश महायुतीला होता पण महायुती करू शकली नाही. त्यांनी सरकार बनवले आहे आम्ही लाडकी बहीण सारख्या अनेक योजना सुरू केल्या… महायुती प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल” असा विश्वास देखील यावेळी मुख्यमंत्र्यानी व्यक्त केला.
#WATCH | Thane: After casting his vote, Maharashtra CM Eknath Shinde says, “Today is the festival of democracy and everyone should participate and vote and this will strengthen Maharashtra, democracy. People have not forgotten what happened in 2019, the mandate was for Mahayuti… pic.twitter.com/MrvO0RtKnV
— ANI (@ANI) November 20, 2024
दरम्यान ,राज्यात एकूण 4 हजार 136 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. तर शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, पक्ष फुटीनंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूका पार पडत आहेत. यासाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला होता. यातच आता महायुती आणि महाविकास आघाडीनेही कंबर कसल्याचं दिसून आले.





