राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बजावला मतदानाचा हक्क ; नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

Maharashtra Assembly Election 2024 । राज्यातील 288 विधानसभा मतदार संघात आज 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. यासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे.राज्यात एकूण 4 हजार 136 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. तर शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. या प्रकियेत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.
#WATCH | Governor CP Radhakrishnan says, “Ours is the biggest democracy of the world. My appeal to all the youngsters, elders and women – they all should come and vote. Whomever they want to vote for is their choice but they should come out and vote. This is the basic duty of… https://t.co/L8IlOCYOE8 pic.twitter.com/b9YkUDazDp
— ANI (@ANI) November 20, 2024
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले, “प्रत्येकाने मतदानाला हजेरी लावावी, हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. कोणी कोणाला मतदान करावे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे, परंतु त्यांनी मतदान अवश्य करावे.” त्यांच्या या आवाहनाने लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाने सक्रिय सहभाग घ्यावा, हा संदेश दिला आहे.





