‘सुमार कामगिरी’ करणाऱ्या भाजपच्या पाच नेत्यांचा पत्ता कट? ; राम कदमांसह ‘या’ 5 आमदारांचा समावेश

Maharashtra Assembly Election 2024 । राज्यात आता विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी अवघ्या १ महिन्याचा भाग शिक्कल राहिला आहे. त्यातच आता सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या नेत्यांची या निवडणुकीसाठी चाचपणी करत आहेत . त्यातच आता जुन्या चेहऱ्यांना थोडं मागे टाकून नवीन तरुण पिढीला पुढे आणण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. त्यातही अनेक विद्यमान उमेदवारांना तिकीट नाकारले जाण्याची शक्यता आहे. यापैकी सर्वात मोठा धक्का हा भाजपचे घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील आमदार राम कदम यांना बसणार आहे.
राम कदमांना उमेदवारांचे तिकीट नाकारले Maharashtra Assembly Election 2024 ।
राम कदम यांची कामगिरी ही हायकमांडला सुमार वाटल्यान यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राम कदम हा भाजपचा प्रसारमाध्यमांवर सातत्याने झळकणारा चेहरा होता. मात्र, सुमार कामगिरीचे कारण देत भाजप नेतृत्त्वाकडून त्यांना यंदा उमेदवारी दिली जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राम कदम यांच्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा हे पिछाडीवर पडले होते.
भाजप नेतृत्त्वाकडून राम कदम यांचा पत्ता कट ? Maharashtra Assembly Election 2024 ।
राम कदम हे 2009 साली राज ठाकरे यांच्या मनसेकडून निवडणूक लढवून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर 2014मध्ये राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 आणि 2019 मध्ये राम कदम सहजपणे निवडून आले होते. दहीहंडी, रक्षाबंधन सोहळा आणि धार्मिक स्थळांच्या यात्रांमुळे राम कदम हे सातत्याने चर्चेत असायचे. मात्र, गेल्या पाच वर्षांमधील त्यांची कामगिरी सुमार असल्यामुळे आणि त्यांची निवडून येण्याची शक्यता कमी असल्यामुळे भाजप नेतृत्त्वाकडून राम कदम यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील 5 आमदारांचा पत्ता कट होणार ?
भाजपकडून मुंबईत राम कदम यांच्यासह पाच आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. या माध्यमातून भाजपच्या जुन्या नेत्यांचे विधानसभेत पुनर्वसन केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. वर्सोवा विधानसभेत विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांच्याऐवजी संजय पाण्डेय यांना उमेदवारी मिळू शकते. तर घाटकोपरमध्ये राम कदम यांचा पत्ता कट झाल्यास महायुतीचा चेहरा कोण असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर सायन मतदारसंघात कॅप्टन तमिल सेल्वन यांच्याऐवजी राजश्री शिरवडकर यांना संधी मिळू शकते. घाटकोपर पूर्व मतदारसंघात पराग शहा यांच्याऐवजी प्रकाश मेहता यांना पुन्हा संधी मिळू शकते. तर बोरिवली मतदारसंघात सुनील राणे यांच्याऐवजी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.





