Maharashtra Ashram Shala : राज्यातील आश्रमशाळांमध्ये दोन वर्षांत ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू
Maharashtra Ashram Shala : गडचिरोली जिल्ह्यातील एका निवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन चिमुकल्या आदिवासी विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, राज्यातील आश्रमशाळांमधील एक अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Maharashtra Ashram Shala : गडचिरोली येथील एका निवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन आदिवासी मुलींच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर जोरदार टीका होत असताना, एका धक्कादायक आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील आश्रमशाळांमध्ये ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Ashram Shala)
आदिवासी विकास विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ५०० सरकारी आणि ५१३ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांत सरकारी आश्रमशाळांमध्ये ३८४, तर अनुदानित शाळांमध्ये २०० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. २०२४-२५ मध्ये १७० आणि २०२५-२६ मध्ये २१४ मृत्यू नोंदवले गेले. (Maharashtra Ashram Shala)
गंभीर आजार, अपघात, आत्महत्या आणि सर्पदंश यांसारखी विविध कारणे या मृत्यूंमागे असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जप्तलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत ९ ऑगस्टच्या मध्यरात्री विषारी सापाच्या डंशाने तीन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता, तर काही मुलींवर उपचार सुरू आहेत. (Maharashtra Ashram Shala)
याप्रकरणी प्रशासकीय गैरव्यवहार आणि हलगर्जीपणाचा आरोप करत काँग्रेसने महायुती सरकारला धारेवर धरले आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अनुदानित शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे कठोर आदेश दिले असून, या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Maharashtra Ashram Shala)
Ashram 3 Teaser : बदला पूर्ण होणार की बळी जाणार ! ‘आश्रम ३’चा दमदार टिझर प्रदर्शित





