Transfer News : हिवाळी अधिवेशन संपताच फडणवीस सरकारकडून 23 अधिका-यांच्या बदल्या

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर तब्बल 23 अधिका-यांची बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या काळात नवीन सरकारने कोणते निर्णय घेतले हे सांगितले. दरम्यान, बदल्यांमध्ये काही अधिका-यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
अमरावती विभागाचे उपायुक्त (सामान्य) संजय ज्ञानदेव पवार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेचे संचालय नंदू बेडसे यांना पदोन्नती देत अल्पसंख्याक विकासच्या आयुक्तपदी छत्रपती संभाजीनगरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
सुनील बालाजीराव महिंद्राकर (एससीएस पदोन्नती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, लातूर यांची व्यवस्थापकीय संचालक, एम.एस. या पदावर बदली करण्यात आली आहे. रवींद्र जिवाजी खेबुडकर (एससीएस पदोन्नती), उपसभापतींचे खाजगी सचिव, विधान परिषद, मुंबई यांची, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय निलेश सागर, लक्ष्मण राऊत, बाबासाहेब बेलदार आणि जगदीश मिनियार यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
माधवी सरदेशमुख यांना पदोन्नती देत मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण-डोंबिवली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ. ज्योत्स्रा पडियार यांची आयुक्त, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अण्णासाहेब चव्हाण यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गोपीचंद कदम यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बापू पवार यांची सहसचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेश आव्हाड यांची हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.





