Bharat Gogawale : महाराष्ट्राचे केंद्राकडे तीन हजार कोटी अडकले; मंत्री भरत गोगावले यांचं मोठं विधान
Bharat Gogawale : केंद्र सरकारकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (MGRNREGA) महाराष्ट्राचे तब्बल ३ हजार कोटी रुपये प्रलंबित आहेत.

Bharat Gogawale : केंद्र सरकारकडे रोजगार हमी योजनेच्या बिलाचे राज्याचे 3 हजार कोटी रुपये अडकल्याचे शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले आहे. ते पैसे आले की ठेकेदारांचे पैसे देणार असल्याचेही गोगावले म्हणाले. गोगावले हे पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Bharat Gogawale)
गोगावले म्हणाले, रोजगार हमी योजनेतील अनेक ठेकेदारांची बिले रखडली असून, केंद्र सरकारकडे राज्य सरकारचे 3000 कोटी रुपये अडकले आहेत. ते पैसे आल्यानंतर गेल्या तीन-चार वर्षांपासून थकलेली ही बिले दिली जातील. (Bharat Gogawale)
यामध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून महाराष्ट्राला 3 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. ही रक्कम केंद्राकडे आहे. याबाबत शिवराज सिंह चौहान यांना जास्तीत जास्त रकमेची मागणी केली असून, ते पैसे आल्यावर थकीत बिले दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Bharat Gogawale)
तसेच, राष्ट्रवादी (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी पूर्वीच्या काळात मराठा आरक्षण प्रश्न निर्णय घ्यायला हवे होते, या विखे पाटील यांच्या विधानाबाबत गोगावले यांनी सावध प्रतिक्रिया दिली. जुन्या काळात अटी शर्ती फारशा नव्हत्या. (Bharat Gogawale)
त्यावेळी निर्णय घेतला असता, तर यांचा फायदा समाजाला झाला असता, असे विखे पाटील यांना वाटले असेल. तर पवारांनी करायला हवे होते, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली. (Bharat Gogawale)
वैयक्तिक विचाराला औषध नसते मात्र, कितीही टीका झाली तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहेत, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी मराठा आंदोलन मनोज जरांगे यांच्याकडून होत असलेल्या टीकेबाबत दिली. (Bharat Gogawale)






