Maharashtra Cabinet Meeting Decisions : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महायुती सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले. या बैठकीला तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष उपस्थित नव्हते मात्र ऑनलाईन उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आता हे निर्णय कोणते आहेत थोडक्यात जाणून घेऊयात…
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
१) पुणे- छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार
२) अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार
३) शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य करणार
४) बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देणार
५) अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. 36 हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार
६) औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते देणार
७) थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ करणार
८) धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार
९) काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय उभारणार
१०) हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा करणार





