Mahakumbh 2025 : महाकुंभला जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेवर दगडफेक; Video व्हायरल !

Mahakumbh 2025 : झाशीहून प्रयागराज महाकुंभाला जाणाऱ्या ट्रेनवर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की, हल्लेखोरांनी दगडफेक केली आणि ट्रेनची तोडफोड केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना झाशी विभागातील हरपालपूर स्टेशनची आहे. हल्ल्यादरम्यान रेल्वेच्या बोगीतील प्रवासी घाबरले होते. हल्लेखोरांनी ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि ट्रेनचे दरवाजे आणि खिडक्याही फोडल्या आहेत.
ट्रेनवर दगडफेक का करण्यात आली?
वीरंगना लक्ष्मीबाई झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेन क्रमांक ११८०१ वर दगडफेक करण्यात आली. प्रयागराजला जाण्यासाठी हरपालपूर रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवासी जमले होते असे सांगण्यात येत आहे. पण ट्रेनमध्ये आधीच उपस्थित असलेल्या प्रवाशांकडून ट्रेनचे गेट उघडले जात नव्हते.
यामुळेच स्टेशनवर उपस्थित जमाव संतप्त झाला आणि त्यांनी दगडफेक आणि तोडफोड सुरू केली. दगडफेक आणि तोडफोडीमुळे प्रवाशांमध्ये आरडाओरडा सुरू झाला. प्रवाशांनी सांगितले की, अचानक स्टेशनवर उपस्थित असलेल्या जमावाने दगडफेक आणि हल्ला करण्यास सुरुवात केली. ट्रेनमध्ये महिला आणि लहान मुले होती जी महाकुंभस्नानासाठी प्रयागराजला जात होती.
हल्लेखोरांच्या तोंडाला कापड बांधलेले :
ही ट्रेन झाशीहून प्रयागराजला जात होती, पण जेव्हा ट्रेन मध्यप्रदेशच्या हरपालपूर स्टेशनवर पोहोचली. ट्रेन त्या ठिकाणी उभी होती म्हणून काही लोक तिथे आले. त्यानंतर त्यांनी दगडफेक केली आणि प्रवाशांना दुखापत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या तोंडाला कापड बांधले होते, त्यांची संख्या ८-१० असल्याचे सांगितले जाते. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या लोकांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ट्रेनमध्ये चढण्यासाठी केले प्रयत्न :
यावेळी हल्लेखोरांनी ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी वेळीच ट्रेनचे दरवाजे बंद केले. त्यामुळे लोकांना जास्त दुखापत झाली नाही. ही घटना काल रात्री १० ते ११ च्या दरम्यान घडल्याचे सांगितले जात आहे. ही घटना घडताच या प्रकरणात कारवाई करण्यात आली. ट्रेन लगेच रवाना झाली. आणि स्टेशनवर असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला असून, त्या आधारावर पुढील कारवाई केली जात आहे.





