महायुतीचे टेन्शन वाढलं ! सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास…महादेव जानकरांनी दिला इशारा

मुंबई : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विधानसभा निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटापाच्या जोरदार बैठका सुरू आहेत. यादरम्यान रासपचे नेते महादेव जानकर यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीला इशारा दिला आहे.
काय म्हणाले महादेव जानकर?
रासपचे नेते महादेव जानकर यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास २८८ जागांवर निवडणूक लढणार आहे. रासपची महायुतीकडे ३५ ते ४० जागांची मागणी आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यातच अजून जागा वाटप होत नसल्याने आमच्याशी चर्चेचा विषय नाही, असा टोला यावेळी महादेव जानकर यांनी लागावला आहे.
मी माझ्या पक्षासाठी कमिटेड आहे. महाविकास आघाडीने संपर्क केला नाही. आमची महायुतीसोबत युती असल्यामुळे महाविकास आघाडी आम्हाला काही विचारणार नाही. महाविकास आघाडी सध्या हवेत आहे. आम्ही कोणावर अवलंबून नाही. मी माझ्या पायाने खंबीर आहे. मी माझ्या ताकदीने १० ते १२ आमदार निवडून आणू शकतो यावर मला विश्वास आहे असेदेखील महादेव जानकर म्हणाले.





