Maharashtra Politics : मोठी कारवाई! शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक; काय आहे प्रकरण?
Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोशल मीडिया प्रमुख महादेव बालगुडे यांना आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अटक झाली आहे.

Maharashtra Politics : सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याच्या आरोपावरून पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सोशल मीडिया विभागाचे राज्य प्रमुख महादेव बालगुडे यांना अटक केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव बालगुडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मॉर्फ करून आक्षेपार्ह स्वरूपात सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी नक्षलवादी नेता हिडमा याचे उदात्तीकरण करणारी सामग्रीही शेअर केल्याचे समोर आले आहे. (Maharashtra Politics)
या प्रकरणी एका वकिलाने पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवत बालगुडे यांना अटक केली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस करत असून, पुढील चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)




